नांदेड: अश्लील संदेश प्रकरण; जिल्हा परिषदेचा वस्तुस्थितीवरील खुलासा
Nanded, Nanded | Sep 14, 2025 मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अश्लील संदेश पाठवणाऱ्या कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याच्या निलंबनाची कारवाई ह्या मथळ्याखाली काही माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्या संदर्भात जिल्हा परिषदेने आज रोजी दुपारी 4:30 सुमारास प्रेस नोट जारी करत आपले म्हणणे तथा खुलासा सादर करत सदरील प्रकरणावर काही बाबी स्पष्टपणे मांडल्या आहेत.