मांडवी ते जवरला रोड पुलाजवळ मौजे जवरला येथे दि २१ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी एकच्या सुमारास यातील आरोपी प्रभाकर राठोड हा वाहन क्रमांक एपी २४ टीए ५१८२ मध्ये विना परवाना बेकायदेशीररित्या पाच गोवंश जनावरे डांबलेल्या अवस्थेत निर्दयीपणे त्यांची वाहतूक करीत असताना पोलिसांना मिळुन आला. याप्रकरणी फिर्यादी पोलिस हेडकॉन्स्टेबल जानकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी मांडवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.