कर्जत: कर्जत मध्ये सुसज्ज ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिटचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
Karjat, Raigad | Sep 29, 2025 आज सोमवार दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीसाठी एक महत्वाचे पाऊल उचलत उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारलेल्या या युनिटचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य सेवा पुरवणे, सार्वजनिक आरोग्यासाठी उपाययोजना करणे, प्रयोगशाळा बळकट करणे आणि तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून उत्तम उपचार उपलब्ध करून देणे.