भारतीय सण-उत्सवांमध्ये मकर संक्रांतीचे एक वेगळेच महत्त्व आहे. 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' म्हणत एकमेकांना शुभेच्छा देण्याचा हा सण आनंदाचा आणि उत्साहाचा असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या आनंदाला 'नायलॉन मांजा' नावाच्या जीवघेण्या संकटाचे ग्रहण लागले आहे.दरम्यान हे ग्रहण दूर करण्यासाठी ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे.