राजूरा: महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण
अंधारातून प्रकाशाकडे नेणारे प्रज्ञासूर्य, स्वातंत्र्य-समता-बंधुता-न्याय यांचे अमर तत्त्वज्ञान घडवणारे महामानव, ज्ञानाचा अथांग सागर आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दि 6 डिसेंबर ला 12 वाजता संविधान चौक, राजुरा येथे विनम्र अभिवादन करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी त्यांच्या विचारांना आणि कार्याला अभिवादन केले.