बार्शीटाकळी: काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा आज 96.78 टक्क्यांवर चार दरवाजे उघडले नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा आज 96.78 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाचे 4 गेट प्रत्येकी 60 सें.मी. ने उघडण्यात आले असून त्यातून 197.92 घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.प्रशासनाने नदीकाठच्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी अनावश्यकपणे नदीकाठी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.