उत्तर सोलापूर: बेगम पेठेतील इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार सोलापूर आणि धाराशीव जिल्ह्यातून 2 वर्षांकरिता तडीपार...
इलियास उर्फ ब्रँड अजीज सालार, वय-३२ वर्षे, रा. मक्का मशिदीचच्या पाठीमागे, बेगम पेठ, सोलापूर याच्याविरुध्द सन २०१६, २०१८, २०२१ व सन २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, सामान्य नागरीकांना मारहाण व दमदाटी करुन दहशत निर्माण करणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्या विरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ)यांना सादर करण्यात आले.