श्रीवर्धन: स्वयंभू व जागृत बेलेश्वर देवस्थान, जावेळे येथे ‘भक्त निवास’चा भूमिपूजन सोहळा
आज शनिवार दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र स्वयंभू व जागृत बेलेश्वर देवस्थान, जावेळे येथे ‘भक्त निवास’चा भूमिपूजन सोहळा पार पडला. याप्रसंगी खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार तुकाराम सुर्वे यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपस्थितांना संबोधित केले. ‘आजपर्यंत आम्ही श्रीवर्धन तालुक्याचा विकास डोळ्यापुढे ठेवूनच जनसेवेसाठी नेहमीच तत्पर राहिलो. या पुढील काळातही बेलेश्वर देवस्थानाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध असून येथे येणाऱ्या भाविक भक्तांसह पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यास आमचे प्राधान्य राहील’, असा ठाम विश्वास व्यक्त केला.