सडक अर्जुनी: शेंडा येथे बिबट्याने पाडला दोन बकरे व एका शेळीचा फडश्या
शेंडा,कोयलारी, कोहळीपार, आपकारीटोला, मसरामटोला, उशीखेडा, सालाईटोला परिसरात सध्या बिबट्या धुमाकूळ घालत असून या परिसरातील कोंबड्या बिबट्याने फस्त केल्या, तर अनेक शेळी बकऱ्यांचे बळी बिबट्याने घेतले आहे. याच घटनाक्रमात शेंडा येथील मनोहर भास्कर दिघोरे यांच्या घरच्या गोठ्यात प्रवेश करून पहाटेच्या सुमारास दोन बकरे व एका शेळीचा फडश्या बिबट्याने पाडला आहे. जवळपास त्यांचे ३५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.