वर्धा: दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळून वर्धा पोलिसांच्या जाळ्यात – मोठा गुन्हा उधळून लावला
Wardha, Wardha | Sep 22, 2025 वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अत्यंत तत्परतेने कारवाई करत, दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर हत्यारे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोडजवळील एका निर्जन परिसरात करण्यात आली.