जळगाव: इच्छादेवी चौकात ओमनी कारने सायकलस्वाराला उडविले; वृध्दाचा जागीच मृत्यू; जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव शहरातील इच्छा देवी चौकात चुकीच्या मार्गाने येणाऱ्या एका ओमनी कारने समोरून सायकलस्वार वृध्दाला उडविल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. वसंत प्रताप पाटील (वय-७०, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.