कोपरगाव नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे पराग संधान हे विजय झाल्याबद्दल शहरातील वाणी कॉम्प्लेक्स येथे आज दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वा. व्यापारी बांधवांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.नुकतीच कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे पराग संधान व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे काका कोयटयांची लढत झाली. या लढतीत भाजपचे संधान हे विजयी झाले आहे.