मोहोळ: घरात पाणी शिरलेल्या कुटुंबीयांना दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू देण्यात येणार : तहसीलदार सचिन मुळीक
Mohol, Solapur | Sep 28, 2025 मोहोळ तालुक्यातील सेना नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. दरम्यान, या पूरग्रस्त कुटुंबीयांना प्रत्येक कुटुंबाला दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू देण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळे यांनी दिली आहे. आज रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी दहा वाजता सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ शेअर करत त्यांनी माहिती दिली आहे. त्याचबरोबर सीना नदीपात्रात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांनी ज्या ठिकाणी स्थलांतर केले आहे त्याच ठिकाणी थांबावे असे आवाहन केले.