पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग क्रमांक ४१ (महादेववाडी-उंड्री) मध्ये बोगस मतदानाचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी उंड्री चौक परिसरातील मतदान केंद्रावर स्वतः उपस्थित राहून काही बोगस मतदारांना रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.