नेवासा येथे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा तहसील अंतर्गत सर्व प्रशासकीय विभागांची लोकहित आढावा बैठक पार पडली. या बैठकीत विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेऊन नागरिकांशी संबंधित प्रलंबित प्रश्न, विकासकामे व अडचणींवर सखोल चर्चा करण्यात आली.