भोकरदन: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दानापूर जुई धरणात युद्ध पातळीवर नगरपरिषदे कडून दुरुस्ती सुरू
आज दिनांक 18 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथे असलेल्या जुई धरणामध्ये भोकरदन शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीची दुरुस्ती सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे,ही दोस्ती भोकरदन नगर परिषदे कडून करण्यात येत असून मागील काही दिवसापासून शहराला पाणीटंचाईच्या झळ सहन करावी लागत आहे,याचे कारण या पाईपलाईन मध्ये लिकीज झाले होते, आणि याचे आता युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.