सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 12 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार, गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आरोपीला राजस्थान येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्याच्या फरारसाथीदाराचा शोध पोलीस घेत आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी दिली आहे