वणी: गौण खनिज उत्खनन करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करणाऱ्या दोघांवर चोरीचा गुन्हा दाखल कोरंबी मारेगाव येथील घटना
Wani, Yavatmal | Oct 22, 2025 अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करताना आढळलेल्या दोघांवर वणी पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राम महसूल अधिकारी चंद्रशेखर मसराम यांनी चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. वैभव ज्ञानेश्वर टोंगे, योगेश पुंडलिक बदखल, दोघ रा. मारेगाव (कोरंबी), ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. गौण खनिज तस्करी रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या नवीन कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.