सेनगाव: दाताडा बुद्रुक येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून सरपंच नागनाथ आप्पा परदेशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
सेनगांव तालुक्यातील दाताडा बुद्रुक या ठिकाणी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला आहे. यावेळी दाताडा बुद्रुक येथील सरपंच नागनाथ आप्पा परदेशी यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालयासमोर ध्वजारोहण करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ नागरिक,सामाजिक कार्यकर्ते,राजकीय पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यात आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साह साजरा करण्यात येत आहे.