भंडारा: जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा पार; विकासकामांना गती देण्यावर भर
भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण सभा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सायं. ७ वा. दरम्यान पार पडली. जिल्ह्यातील विकासकामांचा सर्वांगीण आढावा घेणे, प्रलंबित योजनांना गती देणे आणि नव्या विकास उपक्रमांना योग्य दिशा देणे या उद्देशाने ही बैठक अत्यंत फलदायी ठरली. सभेत विशेषतः पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण व नागरी भागातील रस्ते दुरुस्ती, शैक्षणिक व आरोग्य सुविधा उभारणी, जलसंधारण व सिंचन प्रकल्प, कृषी विकास...