पालीच्या बिंदुसरा धरणाजवळ कंटेनरचा भीषण अपघात कंटेनर डिवाइडरला धडकला, धुळे सोलापूर महामार्गावरील घटना
Beed, Beed | Sep 16, 2025 धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाली येथील बिंदुसरा धरणाजवळ एक भीषण अपघात घडला. महामार्गावरून वेगाने जात असलेला कंटेनर अचानक नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या डिव्हायडरवर जाऊन जोरदार धडकला. या धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील नागरिक आणि वाहनधारक काही क्षणांसाठी घाबरून गेले. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कंटेनरचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून वाहन महामार्गाच्या मध्यभागी अडकून राहिल्याने काही वेळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता.