यशोदा नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 30 जानेवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करणाऱ्या मुख्याध्यापिका व शिक्षिके विरुद्ध यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात चाइल्ड हेल्पलाइन नंबर वर तक्रार तक्रार करण्यात आली होती. सातव्या वर्गातील विद्यार्थिनीला मारहाण करण्यात आली आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.