नगरपालिका व नगरपरिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेला जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवावा असे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नवी मुंबईत आयोजित केलेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.