जळगाव शहरातील शांतता मानल्या जाणाऱ्या मेहरुण तलाव परिसरात एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यावर काहीही कारण नसतांना चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी १६ जानेवारी रोजी रात्री १०.३० वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी १७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.