नवी मुंबई महानगरपालिका सेवेतून ऑक्टोबर महिन्यात निवृत्त होणा-या १० अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांचा सेवानिवृत्ती सन्मान समारंभ महापालिका मुख्यालयात ज्ञानकेंद्रामध्ये संपन्न झाला. यावेळी महापालिका सचिव श्रीम.चित्रा बाविस्कर, सहा.आरोग्य अधिकारी रत्नप्रभा चव्हाण, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी विजय रांजणे आदी मान्यवर तसेच इतर अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांचे कुटूंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती महापालिकेने आज सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास दिली.