दत्त जयंतीनिमित्त पाचोरा शहरातील कॉलेज चौकातील श्री दत्त मंदिरात पूजा-अर्चना करून भक्तिमय वातावरणात श्री दत्त आरतीचा भक्तीमय सोहळा आज दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता पार पडला. यावेळी पाचोरा शहरातील सर्वच भागातील भाविक श्रद्धेने सहभागी झाले होते, एस एस एम एम कॉलजे प्रांगणात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.