खालापूर: रायगडसाठी शिवसेनेकडून आमच्याकडं कोणताही प्रस्ताव नाही – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये निवडणुकांना एकत्र सामोरं जायचं की एकला चलोचा नारा द्यायचा, यावरुन चर्चा सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील मंत्री भरत गोगावले यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडं प्रस्ताव पाठवल्याच्या चर्चा सुरु आहेत. यावर आज गुरुवारी दुपारी ३ च्या सुमारास प्रदेशाध्यक्ष सुनील धटकरे यांनी प्रतिक्रिया दिली.