नागपूर ग्रामीण: समृद्धी हायवेवर ट्रक उलटून चालकाचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर सोमवारी रात्री च्या सुमारास ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात उपचारा दरम्यान चालकाचा मृत्यू झाला. विवेक भीमराव ठाकरे वय २४ वर्ष राहणार मुलताई, मध्य प्रदेश असे मृत चालकाचे नाव आहे. वणीहून जबलपूरकडे जात असताना गेल गॅस सबस्टेशनजवळ ट्रकचे नियंत्रण सुटून हा अपघात घडला. उपचारादरम्यान एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास पोलीस करीत आहे