केज: केज पोलीस ठाणे हद्दीत एका शेतात 35 लाख रुपयांच्या गुठक्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली
Kaij, Beed | Sep 26, 2025 केज पोलीस ठाणे हद्दीत एका शेतात गुटखा साठवून विक्रीसाठी नेण्याच्या तयारीत असलेल्या पिकप वाहनावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल 35 लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बीड स्थानिक शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पिकअप भरून मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीसाठी जात असल्याचे समजले. त्यानंतर रात्रीच पोलिसांनी शेताजवळ सापळा रचून पिकपसह गुटखा जप्त केला. ही कारवाई बीड पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत , अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेने केली.