जालना: बसस्थानकासमोरील वैष्णवी लॉजवर पोलिसांचा छापा; देहविक्री प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा
Jalna, Jalna | May 27, 2026 जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसस्थानकासमोरील न्यू वैष्णवी लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित देहविक्री व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच जणांविरुद्ध सदरबाजार पोलीसांनी कारवाई केली आहे. बुधवार दि. 27 मे 2026 रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई पोलीस अधिक्षक तेघबीर सिंह संधु तसेच अप्पर पोलीस अधिक्षक विक्रम साळी यांच्या आदेशानुसार सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. पोनि. भारती यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.