जालना: धुळे-सोलापूर महामार्ग भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; आमदार लोणीकरांनी केली होती मागणी
Jalna, Jalna | May 8, 2026 धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणातील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याला मोठे वळण मिळाले असून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी लातूरमधून ताब्यात घेतले आहे. शुक्रवार दि. 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत आवाज उठवत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी सुरू केली आहे.