कोतोली फाटा ते आसूर्ले पोर्ले जाणाऱ्या रोडवर दोन दुचाकींच्या धडकेत यातील फिर्यादी नितीन भोसले यांचा चुलत भाऊ राहुल भोसले व संशयित दुचाकी चालक राहुल माळी हे दोघेजण जखमी झाले प्रकरणे फिर्यादीने संशयित दुचाकी चालकाविरोधात करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.