पालघर: बाभोळा येथे गटारात पडली गाय; अग्निशमन दलाने जखमी गायीला काढले बाहेर; व्हिडिओ व्हायरल
वसई विरार महानगरपालिका हद्दीतील बाभोळा परिसरात एक गाय गटारात पडल्याची घटना घडली आहे. गटाराला चेंबर नसल्याने रात्रीच्या अंधारात गाय अचानक गटारात पडले याबाबतची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले आणि गटारात पडलेल्या गाईला बाहेर काढण्यात आले. या घटनेत गाय जखमी झाली असून घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.