ठाण्याच्या नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी येथील गिरीराज ड्रीम या 30 मजली इमारतीच्या 26 व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना रात्री उशिरा घडली होती. अचानक इमारतीत आग लागल्यामुळे परिसरात धूर पसरला आणि एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही परंतु घर पूर्णपणे जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.