केज: केज पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण, तरुणावर गुन्हा दाखल
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील एका १६ वर्षीय ऊसतोड मजुराने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले इतकेच नव्हे, तर चक्क तिच्या पित्याला फोन करून मुलीचे अपहरण केल्याची माहिती दिली. या थरारक 'सिनेमा स्टाईल' घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील एका खेडेगावातील अल्पवयीन मुलीचे वडील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनावर चालक म्हणून काम करतात.