सेनगाव: ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या,शेतकरी नेते मारोती गीते यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता शेतकरी नेते मारोती गीते यांच्यासह शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होत असुन त्यातच या अति पावसामुळे चक्क उभ्या सोयाबीनलाच कोंब येत असल्यामुळे शेतकऱ्याचा लागवड खर्चही वाया जात असल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली.