सेनगाव: पुसेगांव येथील अनिल ठोके यांच्या दारूच्या व्यसनावर आधारित मदीरा लघु चित्रपटाला लाखाच्यावर प्रेक्षकांची पसंती
सेनगांव तालुक्यातील पुसेगांव येथील रहिवासी असलेले अनिल ठोके यांचा दारूच्या व्यसनावर आधारित मदीरा एक हृदयस्पर्शी कथा हा लघु चित्रपट सद्यस्थितीत सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून तब्बल एक लाखाच्यावर प्रेक्षकांनी चित्रपटाला पसंती दिली आहे. दारूच्या व्यसनामुळे संसार कसा उध्वस्त होतो हे या लघु चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटण्यात आले असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून जवळपास 1 लाखाच्यावर प्रेक्षकांनी या चित्रपटाला पसंती दिली आहे.