चांदूर रेल्वे: जळका जगताप येथे धारदार शस्त्राने इसमावर जीवघेणा हल्ला; दोन जनाविरुद्ध कुऱ्हा पोलिसात गुन्हा दाखल
जळका जगताप येथे एका इसमावर जीवघेणा हल्ल्यात केल्याची तक्रार एका 40 वर्षीय महिलांनी कुऱ्हा पोलिसात दिले आहे. फिर्यादी महिलेचा पती जेवण केल्यानंतर सायंकाळी फिरायला बाहेर गेला असता, भारत शामराव तिवाडे वय वर्ष 32 अक्षय शामराव तिवाडे वय वर्ष 30 हे दोघेही संगमत करून धारदार शस्त्र घेऊन आले व फिर्यादी महिलेच्या पतीवर जीव घेण्याच्या उद्देशाने अंधाधून वार केले अशी तक्रार सदर महिलेने पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी दोन जनाविरुद्ध विविध कलमाने गुन्ह्याची नोंद केली आहे.