हिंगोली: जलेश्वर तलावातील मत्स्यव्यवसायासाठी 14 ऑक्टोबर रोजी लिलाव
हिंगोलीत असलेल्या जलेश्वर तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, यावर्षी देखील परंपरेनुसार पुढील 5 वर्षासाठी जलेश्वर तलाव १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर लिलावाद्वारे ठेक्याने देण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व्हे क्र. 03 जलक्षेत्र 13 हेक्टर जलेश्वर तलावाची मत्स्य व्यवसायासाठी माहे ऑक्टोबर 2025 ते ऑक्टोबर 2030 पर्यंत या 5 वर्षे कालावधीसाठी हिंगोली तहसील कार्यालयात दि. 14 ऑक्टोबर, रोजी सकाळी 11 वाजता ठेवण्यात आला आहे.