जालना: चिकन-मच्छी मार्केटमधील अतिक्रमणावर महापालिकेची कारवाई; सभापती कपिल भुरेवाल ॲक्शन मोडमध्ये 🧹
Jalna, Jalna | Apr 23, 2026 जालना शहरातील चिकन व मच्छी मार्केट परिसरातील अतिक्रमण अखेर महापालिकेकडून हटविण्यात आले असून, स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे सभापती कपिल भुरेवाल यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत कारवाई केली. महापालिकेकडून संबंधित व्यावसायिकांना यापूर्वी नोटीस व लेखी सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र त्यानंतरही अतिक्रमण हटविण्यात आले नाही. त्यामुळे अखेर महापालिकेने कठोर पाऊल उचलत नूतन वसाहत परिसरातील चिकन व मच्छी मार्केटमधील अतिक्रमण जेसीबीच्या साहाय्याने हटविले. शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्नही गंभीर बनला