जालना: *माजी आमदारांचे आरोप हास्यास्पद; ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले*
– आमदार अर्जुनराव खोतकर
Jalna, Jalna | Jul 9, 2026 जालना मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेतील गैरव्यवहारामुळे अडचणीत आलेल्या शेकडो सभासद, ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी, यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला. राज्याच्या चालू अधिवेशनात हा प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडून शासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळण्यासाठी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे आश्वासन शासनाने दिले आणि त्यानुसार पुढील कार्यवाहीही कर