ठाणे: हजुरी येथे लोकसहभागातून राबवली स्वच्छता मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Thane, Thane | Nov 29, 2025 ठाणे महानगरपालिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाण्यासाठी एका वर्षभरापूर्वी सुरू केलेली आहे. त्या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते. त्या अनुषंगाने ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील हाजुरी येथे माजी नगरसेवक विकास रेपाळे,माजी नगरसेविका नम्रता भोसले यांच्या पुढाकाराने महानगरपालिकेच्या सहकार्याने आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि परिसर स्वच्छ केला.