जळगाव शहरातील वाघ नगरात राहणाऱ्या एका डॉक्टरचे बंद घर फोडून घरातून सोन्याच्या वस्तू, सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर व राउटर असा एकुण ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.