चांदूर रेल्वे: वऱ्हा शेत शिवार येथे विहिरीतील पाण्याची मोटर चोरट्याने केली चोरी; पोलीसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
जगन्नाथ पांडुरंग वाघमारे यांनी अज्ञात चोरट्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. जगन्नाथ यांचे वऱ्हा शेत शिवार येथे शेती असून धुरा कापण्याकरिता गेले असता तहान लागल्याने ते पाणी पिण्याकरता शेतातील विहिरीजवळ गेले तर त्यांना विहिरीतील मोटार रुबी कंपनीची तीन हॉर्स पावरची किंमत अंदाजे 8000 रुपयाची दिसून आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार कुऱ्हा पोलिसात दिली आहे. तेव्हा कुऱ्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.