कोरेगाव: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रोखस्वरूपात मदत देणार;प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रोख स्वरूपात मदत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई शहरातून ११ लाख रुपये मदत जमा झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत रोख स्वरूपात जमा केली जाणार असून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी मंगळवारी दुपारी बारा वाजता दिली. मुंबई येथील प्रदेश कार्यालयासमोर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.