जळगाव जामोद: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक दीपक उमाळे यांचा काँग्रेसच्या वतीने कार्यालयात सत्कार
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक दीपक उमाळे यांचा काँग्रेसच्या वतीने शहरातील कार्यालयात सत्कार करण्यात आला. दीपक उमाळे हे जळगाव जामोद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आदिवासी गाव चारबत येथे सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राज्य शासनाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुण गौरव पुरस्कार देऊन गौरव केला आहे.