बल्लारपूर: अवैधरीत्या रीती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना तीन लाखाचा दंड, कोठारी पोलिसात गुन्हा दाखल
बल्लारपूर तहसील प्रशासनाने अवैध रेती वाहतूक प्रकरणी दोन टॅक्टर मालकांकडून ३ लाख ३१ हजार २०० रूपयांचा दंड वसूल केला. या टॅक्टर मालकांवर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. नरेश बहुरिया व अन्य एक अशी आरोपींची नावे आहेत. तहसीलदार रेणुका कोकाटे व तलाठी आरती डुलत यांनी ट्रॅक्टर थांबवून चौकशी केली असता अवैध रेती आढळली. चालकाने परवाना दाखविण्यास नकार देऊन पळून गेला. ट्रॅक्टर मालकाकडून २ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.