जालना: मौजपुरी पोलिसांची गुटखा विक्रेत्यावर धडक कारवाई; 4 हजार 754 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Jalna, Jalna | May 25, 2026 मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखू विक्री करणार्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत 4 हजार 754 रुपयांचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार दि. 25 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हेडकाँस्टेबल संजय मोहण चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सपोनि अतुल पाटील यांच्या आदेशानुसार मौजपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई केली.