अकोट: सलग दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज निरंक;मतदारांमध्ये राजकीय शुकशुकाटाने आश्चर्य
Akot, Akola | Nov 11, 2025 सलग दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज निरंक असल्याने अकोट नगरपालिका निवडणुकीसाठी अद्याप नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल न झाल्याने निवडणूककी मध्ये राजकीय शुकशुकाट बघायला मिळत आहे. मतदारांमध्ये या राजकीय शुकशुकाटला घेऊन आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे तर अद्याप प्रमुख राजकीय पक्षांनी देखील सावध पावित्रा घेत उमेदवारीची घोषणा न केल्याने अकोट नगरपालिका निवडणूक सध्या वादळापूर्वीची शांतता म्हणून देखील पाहीली जात आहे.