वरोरा: माढेळी येथील अखेर कृषी केंद्राचा परवाना निलंबित
वरोरा तालुक्यातील माढेळी येथील एका कृषी केंद्र संचालकाने शेतकऱ्याला नगदी पावती फाडूनही युरिया खत देण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार तालुका कृषी अधिकारी वरोरा यांचेकडे केलेली होती त्या तक्रारीची दखल घेऊन कृषी केंद्राची तपासणी करून अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांचेकडे पाठविण्यात आला होता त्या अनुषंगाने वरिष्ठांनी त्या कृषी केंद्राच्या परवाना एक महिन्यासाठी निलंबित केल्याचे आदेश आज दि1 20 ऑक्टोबरला 2 वाजता पारित केलेला आहे.